“येथे स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो……”
प्रिय विद्यार्थी मित्र व पालक बंधु-भगिनींनो,
या शैक्षणिक वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे मनः पुर्वक स्वागत ।
या महाविद्यालयाची वाटचाल सन 2008 मध्ये अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीतून झालेली असुन संस्थेच्या स्थापनेपासून शिक्षणाचा सामाजिक संदर्भ आणि आशय लक्षात घेवुन तसेच सध्याच्या माहितीच्या युगात जागतीकीकरणामुळे अनेक क्षेत्रात नौकरी व व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या असुन संधी साधण्यासाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. आज शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहे. विशेषतः विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात कल वाढत असल्याने आणि विद्यार्थ्यांची मुख्य संकल्पना स्पष्ट नसल्याने होत असलेली स्पर्धेतील पिछेहाट लक्षात घेवून, विद्यार्थ्यांची या विषयाबाबतची भिती, कमी झालेला आत्मविश्वास आणि या क्षेत्रात वरचेवर अवघड बनत चाललेली परिस्थिती याचा विचार करून विद्यार्थ्यानेच सामर्थ्यवान बनायास हवे. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या भौतीकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व इंग्रजी या विषयाचा पाया भक्कम होत नाही तोपर्यंत तो या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकत नाही कारण ‘खोटे नाने फार काळ चलनात राहत नाहीत’ आणि ‘तावून सलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचे पोलाद होत नाही’. करिता आम्ही आपल्या पाल्यासाठी त्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा विचार करून जी.आर.एम. ज्युनिअर कॉलेज अथक प्रयत्न करीत आहे. कारण “यशाचे असे कोणतेही गुपीत नसते”, “यश हे फळ असते तयारीचे, कठोर परंतु योग्य दिशेने केलेल्या परिश्रमाचे” आणि महत्वाचे म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील यश म्हणजे केवळ एका माणसाचे यश नसते ते अनेक लोकांच्या संघटनेचे फळ असते. त्यासाठी फक्त योग्य मार्गदर्शक हवा असतो. जी. आर. एम. ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याची पायाभरणी करण्यासाठी अद्याप दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आलेले आहे.
अलिकडील काळात देशपातळीवर एकच सामाईक प्रवेश परिक्षा झाल्यामुळे स्पर्धेत संख्यात्मक तसेच गुणात्मक दृष्टीने प्रचंड वाढ झाली आहे. अश्या स्पर्धेत आपल्याला यश मिळवायचे असेल तर आपली गुणवत्ता व क्षमता प्रचंड वाढविली पाहिजे. यासाठी अथक परिश्रम, नियमीत व योग्य मार्गदर्शन याची अत्यंत आवश्यकता आहे. यासाठी कॉलेज व ट्युशन या दोन्ही ठिकानी फक्त शिकवून किंवा घोकमपट्टी करून गुणव मिळविल्याने गुणवत्ता व क्षमता वाढणार नाही. त्यासाठी दररोज नियमीत अभ्यास करणे व नियमीत गृहपाठ केल्यास विद्यार्थ्यांची गुणवत्ता व क्षमता वाढेल.
प्रत्येक पालक आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल करण्यासाठी अशा कॉलेजच्या शोधात असतो की ज्या ठिकाणी एकाच छताखाली आपल्या पाल्याचे भविष्य घडु शकेल. आपल्याला कळविण्यात आनंद वाटतो की, वरील सर्व बाबींचा व येणाऱ्या अडचणीचा विचार करून आमच्या संस्थेने दहावी नंतर 11 वी व 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी 2 वर्ष कालावधीचा खास शैक्षणिक कार्यक्रम तयार केला आहे. यामध्ये योग्य मार्गदर्शन, उत्तम शिकविणे, नियमीत गृहपाठ, विद्यार्थ्यांचा परिक्षेद्वारे सराव व विद्यार्थ्यांचा कॉलेजमध्येच अभ्यास करून घेणे याचा समावेश केला आहे ज्याच्या बळावर तो यशाची गुढी उभा करू शकेल.
आपला प्रतिसाद व मुलांची जिद्द याच्या जोरावर आणि आमच्या सुनियोजीत कार्यक्रमामुळे आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल होईल याची आम्हाला खात्री आहे.
श्री. देशमुख बाळासाहेब
सचिव,
संत ज्ञानेश्वर मिशन, नांदेड,
जी. आर. एम. कनिष्ठ महाविद्यालय, लातूर.