महाराष्ट्रात JEE/NEET/MHT-CET – Batch 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब (Tablet device)
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET – Batch 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डेटा पुरविण्यात येईल.
पात्रता निकष:
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा आणि नॉन-क्रिमिलेअर असणे आवश्यक आहे.
- सन 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतील.
- विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्यांची निवड 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
- इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविल्या जाईल.
अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)
- रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
- 10 वी ची गुणपत्रिका
- विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट)
- दिव्यांग असल्यास दाखला
- अनाथ असल्यास दाखला
सदर योजनेचा लाभ घेण्या साठी ११ वी science ला प्रवेश घेणे अनिवार्य, तर मग या लिंक वरती क्लिक करुण आत्ताच G.R.M. Junior college, Latur येथे Admission करा ( https://grmcollege.com/admission-form/ )
टीप: अधिक माहितीसाठी संबंधित अधिकृत वेबसाइट, जिल्हा शिक्षण कार्यालयाशी किंवा G.R.M. Junior college, Latur संपर्क साधावा.
Disclaimer: या माहितीचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित अधिकृत संस्थांच्या वेबसाइट किंवा सूचनांचे पालन करावे.






Sakshi Ingale
For further study it’s good to educate and learn new things and have best education skill in next generation
Sakshi Ingale
For further study it’s good to educate and learn new things and have best education skill in next generation From NEET stress to MBBS success
Sakshi Ingale
From NEET stress to MBBS success